Sangli Accident : पुण्यातील पोर्शे अपघाताची सांगलीत टळली पुनरावृत्ती

बड्या बापाच्‍या डॉक्टर लेकीची ‘कामगिरी’
accident
accident esakal

सांगली - पुण्यात नुकत्याच घडलेल्या पोर्शे गाडीच्या अपघातामुळे सर्व सरकारी यंत्रणांचे पितळ उघडे पडले असताना आज सांगलीतही तसाच प्रकार घडला. येथील राम मंदिर चौकात. रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र आपल्या डॉक्टर लेकीने केलेल्या या अपघातचे समर्थन करणारा डॉक्टर बाप मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून अपघातग्रस्तास रक्कम देऊन निघून गेला. याप्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता घडल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

अधिक माहिती अशी, राममंदिर चौकातून शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनांची नेहमीच मोठी गर्दी असेत. एरवी या चौकात वाहतूक पोलिस कधीच नसतात. आज मात्र होते. रात्री आठच्या सुमारास या चौकातच एक चारचाकीने दुसऱ्या गाडीला धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली मात्र, समोरच्या कार गाडीचे मोठे नुकसान झाले. त्या गाडीत ॲप्रन परिधान केलेली एक युवती होती. अपघातानंतर ती घाबरली.

तीने तत्काळ आपल्या पालकाला फोन केले. संबंधित पालक चौकात आले. पोलिसांसह सर्व उपस्थित नागरिकांनी त्यांनी डॉक्टर लेकीच्या चुकीच्या ड्रायव्हिंगची माहिती दिली. मात्र बाप महाशय यांनी तोऱ्यातच मुलगी शिकेल पुढे असे बोलत कुणाचे किती नुकसान झाले आहे ते सांगा अशी थेट पैशाची भाषा केली. डॉक्टर लेकीस नुकताच गाडी चालवण्याचा परवानाही मिळाला होता. परंतू तिला गाडी चालवणे फारसे जमत नव्हते.

पण, बापाचा भक्कम पाठिंबा असल्याने तीने भरगर्दीत डेअरींग केले आणि अंगलट आले. समोरील अपघातग्रस्त डॉक्टर तासगाव तालुक्यातील होते. त्यांनी राडा न करता सबुरीने घेतले. मात्र डॉक्टर लेकीच्या बापाचा तोरा असा होता की सारे काही पैशाने मिळते असा एकूण भाव होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली.

दरम्यान संबंधित डॉक्‍टर लेक येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकते. मराठी येत नसल्याने ती हिंदीत बोलत होती. योगायोगाने तिचे पालकही आज सांगलीत होते. परमुलखात मुलीने जबाबदारी वागावे यासाठी सबुरीचे चार शब्द सांगणे दूर मात्र बाप महाशय त्यांच्या तोऱ्यात एकूण पोलिस यंत्रणेला गृहित धरत होते. त्यांची ती भाषा पोलिस यंत्रणेचे अवमुल्यन करणारी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com