क्षणातच झाले होत्याचे नव्हते ; अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू

accident in national highway father and son dead in dhalgaon sangli
accident in national highway father and son dead in dhalgaon sangli
Updated on

ढालगाव (सांगली) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्‍यात विठ्ठलवाडी गावाजवळ मोटारसायकल व आयशयर टेंपो यांच्यात समोरासमोर झालेल्या आपघातात दोन जण ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. रोहण चिदानंद येनपे (वय २८) व त्यांचा मुलगा शुभम ( वय- ४ , रा. इंदिरानगर, सांगली) ठार झालेल्यांची नावे आहेत. 

घटनास्थळी व पोलिसांतून समजलेली माहिती अशी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एम.एच.१३-सीव्ही.३२७६ वरुन रोहण येनके हे आपली पत्नी भाग्यश्री वय २३ वर्षे, मुलगा शुभम वय ४ वर्षे व मुलगी आरती वय ३ वर्षे असे एका मोटारसायकलवरून सांगोल्यावरून सांगलीच्या दिशेने चालले होते, तर आयशयर टेंपो क्रमांक एम.एच.१३-आर.३२७९ हा मिरजकडून पंढरपूरच्या दिशेने जात होता. विठ्ठलवाडी गावाजवळ उथळे पेट्रोल पंपाजवळ दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक देऊन टेंपो पाचशे मीटरवर जाऊन थांबला, त्यात मोटारसायकलीवरील रोहण व मुलगा शुभम हे दोघे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी भाग्यश्री व मुलगी आरती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. टेंपोचालक विकास वराडे राहणार (वडदेगाव ता.मोहळ जिल्हा.सोलापूर) हा पेंड वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याला निष्काळजीपने  वाहन चालवल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची नोंद पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ishwarpur Sangli dowry death case
Murder in Patgaon, Miraj: Dnyaneshwar alias Mauli Patil allegedly killed in a sharp-weapon attack
Forest Officer Team
Why Are Jat Leaders Opposing the Name Change?
Marathi News Esakal
www.esakal.com