धारवाडजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार

अमृत वेताळ
Saturday, 16 January 2021

तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

बेळगाव : शुक्रवारी (ता.15) संध्याकाळी धारवाड येथील मविणकोप्पजवळील आणखी एका भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मोटर सायकल आणि ओमीनी व्हॅनची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

काल सकाळी सातच्या सुमारास धारवाड बायपास येथे मिनी बस आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात 11 महिलांसह 13 जण ठार झाले होते. काल घडलेली घटना ताजी असतानाच सायंकाळी दुचाकी आणि ओमनी यांच्यात धडक झाली. यात दोन तरुण ठार झाले. तर अन्य दोन जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात) 

हेही वाचा - जिल्ह्यात कारभारी ठरवण्यासाठी एका एका मतासाठी चुरस - 

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident near dharwad in two and four wheeler two dead in accident in belgaum