ट्रॅक्टर कारच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार

accident in near nipani one person dead in accident
accident in near nipani one person dead in accident
Updated on

रायबाग (सौंदलगा) : कंकणवाडी (ता. रायबाग) जवळ मुधोळ-महालिंगपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कारला जोराने धडक दिली. या अपघातात निपाणीतील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे कारचालक रवींद्र महादेव पाटील (रा. सौंदलगा, वय ५०) हे जागीच ठार झाले. तर कारमधील कारखान्याचे शेती अधिकारी जगदीश चन्नबसवण्णावर आणि सेंटर निरीक्षक रघुनाथ देशमुख (रा. भिवशी) हे दोघे गंभीर जखमी झाले. 

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मृत रवींद्र पाटील हे हालसिद्धनाथ सहकारी कारखान्यात चालक म्हणून काम करत होते. ते सोमवारी सकाळी शेती अधिकारी जगदीश चन्नबसवण्णावर आणि सेंटर निरीक्षक रघुनाथ देशमुख यांना घेऊन बागलकोट येथे कारखान्याच्या कामानिमित्त चालले होते. त्यांची कार कंकणवाडी गावाजवळ आली असता समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात कारचालक रवींद्र पाटील हे जागीच ठार झाले. जगदीश चन्नबसवण्णावर आणि सेंटर निरीक्षक रघुनाथ देशमुख या जखमी अधिकाऱ्यावर गोकाकमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक माहिती रायबाग पोलिस घेत आहेत.

सौंदलगा गावावर शोककळा

मृत रवींद्र पाटील हे निपाणीतील हालसिद्धनाथ सहकारी कारखाना येथे चालक म्हणून काम करत होते. त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सौंदलगा गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com