काळ आला होता पण वेळ...; वन खात्याच्या जीपची कारला जोराची धडक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिरोलीतून वाहतूक वळविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसांत नव्हती. 

खानापूर (बेळगाव) : खानापूर-अनमोड मार्गावर कारने वन खात्याच्या जीपला धडक दिल्याने वन कर्मचारी जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. दरम्यान, अरुंद रस्त्यावर दोन्ही वाहने अडकल्याने सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिरोलीतून वाहतूक वळविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसांत नव्हती. 

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, ‘भीमगड अभयारण्य विभागाची जीप (केए २२ जी ६२२) खानापूरच्या दिशेने येत असताना खानापूरहून गोव्याला जाणाऱ्या कारने समोरासमोर धडक दिली. शिरोलीजवळ अनमोड मार्ग अरूंद आहे. त्याचा अंदाज वाहनचालकांना न आल्याने अपघात घडला. त्यात वनकर्मचारी जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - हुबळी-धारवाड अपघाताची ‘सर्वोच्च’ न्यायालयात दखल

अपघातानंतर अनमोड मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प होती. भीमगड अभयारण्याच्या दिशेने अबनाळी फाट्यापर्यंत तर खानापूरच्या दिशेने तेरेगाळीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांचे हाल पाहून वन खात्याच्या विश्रामधामाजवळील मार्गाने शिरोलीतून वाहतूक वळविली. 

केवळ सुदैवाने प्राण वाचले

खानापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या कारला वन खात्याच्या जीपने जोराची धडक दिली. यात चालक किरकोळ जखमी झाला. गोयंकरांच्या कारमध्ये त्यांचे कुटुंबीय होते. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, केवळ सुदैवानेच जीवितहानी झाली नाही. कारमधील कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. स्थानिकांनी त्यांना धीर दिला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident in road of goa khanapur near belgaum but no injury in accident