आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कवितेची साथ

Accompanying poetry at every stage of life
Accompanying poetry at every stage of life

इस्लामपूर : जन्मापासून अखेरपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कविता आपल्याला साथसोबत करते, असे प्रतिपादन रवी बावडेकर यांनी केले. महादेववाडी (ता. वाळवा) येथे आयोजित तिसऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष दि. बा. पाटील, मेहबूब जमादार प्रमुख उपस्थित होते. 

श्री. बावडेकर म्हणाले,""आतून येणारी कविता समाधान देते. आजूबाजूला जे घडते ते आत साचत जाते आणि कवितेतून बाहेर पडते.'' हेरवाडे यांच्या "नको करू हेटाळणी म्हातारपणी', डॉ. दीपक स्वामी यांची "सोने तुला सोन्याची माळ घे', राहुल गौर यांची "बनलो किनारा तुझ्याचसाठी', उत्तम सावंत यांच्या "तृप्त करून मातीला ओहोळ बनून वाहतो' आनंद हरी यांचे "सुने झाले गाव आणि सुने सुने पार झाले', सुनील नायकल यांच्या "कधीतरी भेटायला हवेत दोस्त' कवितांना दाद मिळाली. 

श्री. बावडेकर यांनी "भेजा फ्राय' आणि "एक ऍक्‍सिडेंट हवा आहे' या कविता सादर केल्या. अशोक नीळकंठ, चंद्रकांत देसाई, रमेश खंडागळे, मानसी शेटे, राजेंद्र औंधकर, मुबारक उमराणी, सुरेखा गावडे, नजीर मुल्ला, साहिर पेठकर, अमर पाटील, श्रीराम पाटील, शंकर पाटील, संपतराव देसाई, सुरेश थोरात, अस्मिता इनामदार, निर्मला लोंढे यांनी कविता सादर केल्या. डॉ. राहुल गौर यांनी परिचय सांगितला. सुनिल नायकल यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. मोहिते, बी. डी. खोत, दिलीप गिरीगोसावी, राजाराम यादव, आनंद हरी, पंडित लोहार, उत्तम गुरव, दिनकर मोहिते, नामदेव मोहिते यांनी संयोजन केले. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com