सांगलीत लेखाधिकारी कार्यालयात लाच घेताना दोघांना अटक

परिसरात लाच खोरीची चर्चा
लाच घेताना पकडले
लाच घेताना पकडलेMedia Gallery
Updated on: 

सांगली : निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी पाच हजार रूपयाची लाच घेताना लेखाधिकारी बाबासो महादेव जाधव (वय ३८, रा.वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व कनिष्ठ लेखापरीक्षक बबन रामचंद्र कोळी (वय ५७, रा. इनाम धामणी, ता. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली. विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील लेखाधिकारी, लेखापरीक्षण पथक शिक्षण विभागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात लाच खोरीची चर्चा रंगली होती.

अधिक माहिती अशी,

तक्रारदार यांची निवडश्रेणी पडताळणी स्टॅम्पिंगसाठी व त्यांचे मित्र यांची वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी व स्टॅम्पिंग मिळण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कार्यालयातील लेखाधिकारी जाधव व कनिष्ठ लेखापरीक्षक कोळी यांनी निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली.

लाच घेताना पकडले
वारणाकाठ हादरलाय! शिराळा तालुक्यातील सहा गावांना भूस्खलनाचा धोका

लाच मागितल्यानंतर तक्रारदारांनी ५ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा जाधव व कोळी या दोघांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सापळा रचला. तेव्हा तक्रारदाराकडे पाच हजार रूपये लाच मागून ती रक्कम स्विकारताना जाधव व कोळी या दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर प्रशासकीय इमारतीमध्ये खळबळ उडाली होती. लाचप्रकरणी जाधव व कोळी या दोघांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, संजय संकपाळ, भास्कर भोरे, प्रितम चौगुले, सिमा माने, वीणा जाधव, राधिका माने, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shri Karisiddheshwar temple elephant death
Anandrao Malgunde latest political news
Sangli Crime News Police Controversy
Sangli family accident at Marleshwar