गुन्हे शाखेची कामगिरी! कुर्डूवाडी गोळीबारातील आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

ही कारवाई यांच्या पथकाने केली

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ख्वाजा मुजावर, गोरक्षनाथ गांगुर्डे, राजेश गायकवाड, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मनसावले, पोलिस नाईक बापू शिंदे, लालसिंग राठोड, रवि माने, अजय वाघमारे व केशव पवार यांच्या पथकाने केली.

सोलापूर : कुर्डूवाडी येथील व्यापारी श्री. ढवळसकर व त्यांचे भाऊ प्रवीणकुमार हे दुचाकीवरुन घरी जात असताना आरोपींनी प्रवीणकुमार यांच्यावर गोळी झाडून त्यांच्या हातातील हिशोबाच्या खतावण्याची पिशवी घेऊन पलायन केले. 23 मेपासून गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 10) पकडले आणि न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चारही आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

 

गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी पृथ्वीराज उर्फ गणेश गायकवाड (रा. कुर्डू) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व्यापारी ढवळसकर यांच्यावर गोळीबार करुन लुटण्याचा कट रचला होता. मात्र, या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी भैय्या लेंगरे याच्या ओळखीच्या तुळशी (ता. माढा) येथील व्यक्‍तीने नकार दिला. त्यानंतर लेंगरे याने सुरज भोसले, गणेश कापरे यांच्या साथीने गोळीबार केला. ही घटना 23 मे रोजी ताटे-देशमुख हॉस्पिटलसमोर घडली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी कुर्डूवाडी बायपास रोडवरील टेंभूर्णी चौकातील साई हॉटेलजवळ आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना गराडा घालून पकडले. सुरज भोसले याच्या ताब्यातून पोलिसांनी एक देशी बनवटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ख्वाजा मुजावर, गोरक्षनाथ गांगुर्डे, राजेश गायकवाड, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मनसावले, पोलिस नाईक बापू शिंदे, लालसिंग राठोड, रवि माने, अजय वाघमारे व केशव पवार यांच्या पथकाने केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of Kurduwadi shooting remanded in police custody for eight days