मास्क न वापरणाऱ्या 264 जणांवर कारवाई 

4mask_26.jpg
4mask_26.jpg
Updated on


सांगली : मास्क न वापरणाऱ्या 364 व्यक्तींवर आज पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण रस्त्यावर दुचाकी-चारचाकीने फिरणाऱ्यांवरही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे पाऊण लाखांचा दंड वसूल केला. पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणात करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मास्क न वापरल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. पोलिसांनी आज थेट कारवाई सुरू केली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांवर कारवाई झाली. हुंदडणाऱ्यांवरही कारवाई झाली. त्यांच्यावर कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. 

विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या दुचाकी-चारचाकी चालकांवरही कारवाई करण्यात आली. काल तब्बल दोनशे दुचाकी जप्त केल्या होत्या. सकाळपासून शहरासह जिल्ह्यात सुमारे 259 दुचाकी-चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 72 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्या चालकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नेटिझन्स्‌वर होणार कारवाई 
कोवीड-19 याबाबत सोशल मीडियावर कोणीही विनापरवाना माहिती प्रसिद्ध करणार नाही. शासनाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावरच माहिती प्रसारित होईल. कोणी माहिती प्रसिद्ध केल्यास त्या संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com