इस्लामपूरात खासगी प्रॅक्‍टीस बंद करणाऱ्या सात डॉक्‍टरांवर कारवाई

पोपट पाटील 
Wednesday, 9 September 2020

इस्लामपूर (सांगली)-   कोरोनाच्या काळात खासगी प्रॅक्‍टीस बंद करणाऱ्या शहरातील सात डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काही खासगी रुग्णालयांनीही ऍन्टीजेन टेस्ट करण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इस्लामपूर (सांगली)-   कोरोनाच्या काळात खासगी प्रॅक्‍टीस बंद करणाऱ्या शहरातील सात डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काही खासगी रुग्णालयांनीही ऍन्टीजेन टेस्ट करण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, "" तालुक्‍यातील कोरोनाशिवाय इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात खासगी प्रॅक्‍टीस बंद करणाऱ्या डॉक्‍टरांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून या बाबत खुलासा मागवला आहे. दवाखाना सुरु न ठेवल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशा सात डॉक्‍टरांना नोटीस बजावली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन इस्लामपूर शहरात डॉ. गोसावी, डॉ. परदेशी, डॉ. पोरवाल यांच्या देखरेखीखाली परदेशी हॉस्पीटलमध्ये 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच समाजकल्याण वसतीगृहामध्ये 100 बेडची व्यवस्था सुरु होत आहे. आष्टा शहरात अण्णासाहेब डांगे आयुर्वेदीक महाविद्यालयात 50 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे.

तालुक्‍यातील 11 ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान 5 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर काही ग्रामपंचायतींनी स्वतः 5 बेडची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांची पुढील उपचार मिळेपर्यंत तात्पुरती व्यवस्था होईल. तालुक्‍यातील अधिग्रहीत केलेल्या सर्व उपचार केंद्रांवर एक पथक नियंत्रण ठेवेल. बेडची उपलब्धता, विनाकारण बेडची अडवणूक, शासकीय नियमांचे पालन करुन योग्य उपचार होतात का?, मृत्युचे कारण अशा सर्व बाबींवर या पथकाचे लक्ष असेल. उपचार केंद्रांत दाखल होणारे रुग्ण, त्यांचा खर्च या तपासणीसाठी शासकीय ऑडीटर नेमले जाणार आहेत. कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या ज्या लोकांनी खासगी रुग्णालयाची बीले भरली आहेत, पण त्याविषयी शंका आहे अशांनी बीलाच्या पावत्या दाखवाव्यात, त्यांची चौकशी करु.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against seven doctors for shutting down private practice in Islampur