esakal | अनधिकृत मंडपांवर कारवाईचा "श्रीगणेशा'
sakal

बोलून बातमी शोधा

Action has taken against unauthorized ganesh mandap

नगर : गणेशोत्सवास शहरात कालपासून (सोमवार, ता.2) मोठ्या थाटात सुरवात झाली. सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेने मंडप उभारणीची परवानगी दिलेली आहे. मात्र, शहरातील ज्या गणेश मंडळांनी परवानगी न घेता मंडप उभारले, अशा मंडपांवर कारवाईचा "श्रीगणेशा' महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काल (ता.2) सायंकाळी केला.

अनधिकृत मंडपांवर कारवाईचा "श्रीगणेशा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : गणेशोत्सवास शहरात कालपासून (सोमवार, ता.2) मोठ्या थाटात सुरवात झाली. सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेने मंडप उभारणीची परवानगी दिलेली आहे. मात्र, शहरातील ज्या गणेश मंडळांनी परवानगी न घेता मंडप उभारले, अशा मंडपांवर कारवाईचा "श्रीगणेशा' महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काल (ता.2) सायंकाळी केला.

बागरोजासमोरील अनधिकृत मंडपावर कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली. महापालिका प्रशासनाकडे मंडप उभारणीसाठी परवानगी मागणीचे 275 अर्ज आले होते. त्यापैकी महापालिका प्रशासनाने 265 गणेश मंडळांना परवानगी दिली. शहरात महापालिका प्रशासनाने विनापरवाना मंडपांवर कारवाई करण्यासाठी पथके नेमली आहे. त्यात प्रशासनाच्या पाच विभागांतील अधिकारी व कर्मचारी आहेत.

सातभाई मळा परिसरातील बागरोजासमोर एका मंडळाने विनापरवाना मंडपउभारणी केल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली. त्यानुसार आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी संबंधित मंडप हटविण्याचा आदेश अतिक्रमणविरोधी पथकाला दिला. त्यानुसार इथापे यांच्या पथकाने बागरोजासमोर उभारलेला हा मंडप काल (सोमवारी) सायंकाळी काढून घेतला. पथकात महापालिका व पोलिसांचे प्रत्येकी चार कर्मचारी होते.

loading image
go to top