रात्री नऊनंतर घराबाहेर पडल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020


सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज देशभर जनता कर्फ्यू करण्यात आले होते. त्याला सांगलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. परंतू, आज रात्री नऊ वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. विनाकारण घराबाहेर पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यभरातील शहरी भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सांगलीतही त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज देशभर जनता कर्फ्यू करण्यात आले होते. त्याला सांगलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. परंतू, आज रात्री नऊ वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. विनाकारण घराबाहेर पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यभरातील शहरी भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सांगलीतही त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. 

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही पाय पसरायला सुरूवात केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. सांगली जिल्ह्यात एकही रूग्ण नाही. मात्र, परदेशवारी करून आलेल्यांची तपासणी केली जात आहे. रुग्णालयात विलगीकरण कक्षात काही जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर काही जणांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आज सर्वत्र जनता कर्फ्यू करण्यात आला होता. त्याला सांगलीकरांनी प्रतिसाद दिला. एरव्ही दिसणारी गर्दी आज दिसून आली नाही. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्वत्र बंद ठेवण्यात आले होते. 

याबाबत पत्रकारांशी बोलतांना पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले,""जनता कर्फ्यूनंतर रात्री नऊ वाजल्यापासून उद्या (ता.23) पहाटे पाच वाजेपर्यंत एकानेही घराच्या बाहेर पडू नये. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच उद्यापासून 31 मार्चपर्यंत कलन 144 अर्थात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचीही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. पाचहुन अधिक लोक एकत्रित येवू नये. तसेच ज्यांना घरात विलगीकरण करण्यात आलेले आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये. तसेच झाल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. लोकांनी खबरदारी घ्यावी. उद्यापासून अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यात प्रामुख्याने औषध दुकान, रुग्णालय, किराणा दुकान, भाजीपाला दुकानांचा समावेश आहे. त्यामुळे कोणी घाबरून जावू नका. दुकानात गर्दी करू नका. कोरोना दूर करण्यासाठी साऱ्या सांगलीकरांनी एकत्रित येवून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे.''  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action if you are out of the house after nine in the night