
सांगली : कार्यालयीन वेळेत कर्मचारी हजर नसल्याच्या तक्रारी येत असल्याने हालचाल रजिस्टरची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी वेळेत हजर नसणाऱ्या आणि दिवसभर दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे.