"एनए जयंत क्‍लब', "विजयभाऊ हेल्थ' वर होणार कारवाई

Action will be taken on "NA Jayant Club", "Vijaybhau Health"
Action will be taken on "NA Jayant Club", "Vijaybhau Health"
Updated on

इस्लामपूर : जयंत पाटील एन. ए. कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या व्यायामशाळेला दीर्घ मुदत आणि अत्यल्प भाड्याने जागा देण्याचा करार रद्द करण्याचा निर्णय आज पालिका सभेत झाला. विजयभाऊ हेल्थ क्‍लबबाबत झालेल्या गैरव्यवहारात सहभाग घेऊन आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या तत्कालीन पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी वैभव पवार यांनी केली.

नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले. नगरसेवक वैभव पवार यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन कायदेशीर बाबी तपासत आणि प्राप्त अधिकाराचा वापर करत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीने विषय मताला टाकण्याची केलेली मागणी नगराध्यक्षांनी फेटाळली. राष्ट्रवादीचा "नामंजूर, नामंजूर' असा केलेला गजर दुर्लक्षित राहिला. 


नगराध्यक्ष पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत सभा झाली. निनाईनगर येथील जयंत पाटील एन.ए. कला, क्रीडा मंडळाच्या व्यायामशाळेच्या 1 कोटी 90 लाख खर्चाच्या वास्तूला फक्त 100 रुपये भाडे कसे काय? पालिकेचे नुकसान झाले, त्याला जबाबदार कोण? सामान्यांला आणि पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय का? बगिच्याच्या जागेत गाळे बांधकाम बेकायदेशीर नाही का? असे सवाल श्री. पवार यांनी उपस्थित केला. 
हरकत दाखल करत व्यायामशाळा करार रद्द करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वास्तूचे उद्‌घाटन झाले. विषय वादग्रस्त न बनवता वाद मिटवण्याची सूचना आनंदराव पवार यांनी केली. त्याला नगराध्यक्ष पाटील व पवार यांनी आक्षेप घेतला. तक्रारदार सदस्यांनी योग्य ठिकाणी दाद मागावी आणि विषय रद्द करण्याची मागणी विश्वनाथ डांगे यांनी केली. राष्ट्रवादीकडून झालेली विषय मताला टाकण्याची मागणी नगराध्यक्षांनी फेटाळून लावली. 


सभागृहात होणारी सर्व चर्चा इतिवृत्तात यायलाच पाहिजे, असा आग्रह विक्रम पाटील यांनी धरला. राष्ट्रवादीचे चिमन डांगे, खंडेराव जाधव, शहाजी पाटील, डांगे यांनी समर्थन केले. विभाग प्रमुखाकडे माहिती मागितली तर काय चुकले? असा प्रश्न उपस्थित करत कोमल बनसोडे यांनी अधिकारी रमेश पाटील यांच्यावर आरोप केले. "आम्हाला एवढाच धंदा आहे का? असे उद्धट उत्तर त्यांनी दिले. महिलांचा असा अपमान सहन केला जाणार नाही, असे म्हणताच पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. आरोप फेटाळले.

यापुढे असे प्रकार होऊ नयेत, मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशा सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. शकील सय्यद यांनी आरोग्य विभागाच्या तक्रारी केल्या. आनंदराव पवार आणि विक्रम पाटील यांनी शहरातील पाणीप्रश्न मांडला. सभागृहात दिवंगत, ज्येष्ठ नेते, मान्यवरांची छायाचित्रे लावण्याबाबत चर्चा झाली. अमित ओसवाल, संजय कोरे, खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, चेतन शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com