Belgaum : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकाची सुनावणी पुढे ढकलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालयीन सुनावणीला हजर असलेले येळ्ळूर येथील कार्यकर्ते व ऍड. श्याम सुंदर पत्तार.

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकाची सुनावणी पुढे ढकलली

बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. खटल्यातील साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे जेएमएफसी द्वितीय न्यायालयात २० जानेवारी २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

येळ्ळूर गावच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य नाम फलक हटविण्यात आल्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उलट गावातील ६६ जणांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन न्यायालयात दोषारोप दाखल केला. गेल्या सात वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मात्र न्यायालयात फिर्यादी आणि साक्षीदार हजर होत नसल्याने या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे.सातत्याने तारीख पे तारीख दिली जात असल्याने आतापर्यंत या खटल्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

तर २८ जणांना अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. आज या खटल्याची आज न्यायालयासमोर सुनावणी होती. खटल्यातील सर्व संशयित तारखेला हजर असताना देखील साक्षीदार हजर न राहिल्याने न्यायालयाने पुन्हा एकदा खटल्याची सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी २० जानेवारी २०१२ ला होणार आहे. यावेळी अर्जुन गोरल, सतीश कुगजी आनंद चिट्ठी मोहन कुगजी, रमेश धामणेकर, श्रीकांत नंदुरकर व आदी उपस्थित होते. संशयिताच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार,ऍड हेमराज बेंचण्णावर,ऍड शाम पाटील काम पाहत आहेत

loading image
go to top