

Sangli
ESakal
खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे,” अशा हृदयस्पर्शी शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचे कौतुक करत ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा दिला. गार्डी-घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या लोकचळवळीचा औपचारिक शुभारंभ झाला.