रडायचं‌ नाही; उभं‌ राहायचं : पूरग्रस्तांमागे नाना उभा खंबीर

संतोष भिसे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मिरज - पुरात वाहून गेलं ते रडण्यानं परत येणार नाही, म्हणून रडायचं नाही. आपणच एकमेकांच्या पाठीशी रहायचं. परत उभं रहायचं या शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी पुरग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घातली. मी परत निश्चित येईन, सर्वजण नव्य़ाने उभे राहीपर्यंत पाठीशी राहीन, सर्वांना पुन्हा उभं रहायचं आहे. ते उभे राहीपर्यंत येत जाईन. हे कोणा राजकारण्याचं आश्‍वासन नाही, नानाचं आहे. असा शब्दही त्यांनी दिला. 

आज त्यांनी शिरोळ व अर्जुनवाड येथील पुरग्रस्तांशी संवाद साधला. कृष्णा नदीवरचा अर्जुनवाड ते कृष्णाघाट पूल रिकामा झाल्याने दुचाकीवरुन कृष्णाघाटावर आले. त्यांच्या अनपेक्षित येण्याने कृष्णाघाटावरील पुरग्रस्तांना काही क्षण पुराच्या आसमानी संकटाचाही विसर पडला. तो दुवा पकडून नाना म्हणाले, अशा संकटाच्या प्रसंगी कोणीतरी आपल्यासोबत आहे ही भावनाही दिलासा देणारी असते. शासनाच्या मदतीला मर्यादा आहेत. आपणच एकमेकाच्या पाठीशी राहूया. येथे काय झालंय हे पहायला मी आलोय. पुन्हा येईन. सर्वांना पुन्हा उभं रहायचं आहे. ते उभे राहीपर्यंत येत जाईन. हे कोणा राजकारण्याचं आश्‍वासन नाही, नानाचं आहे. 

सगळ्या पुरग्रस्तांना मदत मिळावी अशी एका भगिनीची विनंती ऐकून नाना म्हणाले, सर्वांनाच मदत मिळेल. काळजी करु नका. मदतीचा निर्णय घेऊनच मी आलोय. सगळं काही निश्‍चितपणे ठिक होईल, थोडा धीर धरा. नानाच्या दिलाशाने पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. पुरग्रस्तांच्या पाठीवर थाप मारत नानांनी दुचाकीला किक मारली, आणि ते परत अर्जुनवाडकडे परतले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Nana Patekar comment visit to flooded area in Sangli Kolhapur