esakal | हे आहेत व्यसनी, तळीरामांचे फंडे
sakal

बोलून बातमी शोधा

addicts are finding new ideas in the  block

सांगलीत कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पानटपऱ्या, दारु दुकाने बंद करण्याच्या सक्‍त सूचना दिल्या आहेत. मात्र या सूचनांची पायमल्लीच होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

हे आहेत व्यसनी, तळीरामांचे फंडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पानटपऱ्या, दारु दुकाने बंद करण्याच्या सक्‍त सूचना दिल्या आहेत. मात्र या सूचनांची पायमल्लीच होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

20 रुपयांचा मावा तब्बल 40 ते 50 रुपयापर्यंत पोहोचला आहे. तर गुटख्याच्या पुडीची तिप्पट दराने ब्लॅकने विक्री सुरु आहे. नशेबाज व तळीरामांनी किक बसण्याठी यावर नामी उपाय शोधला आहे. गुटखा, मावा, दारुची ऑर्डर देत पार्सल पॅटर्न सुरु केला आहे. पानटपऱ्यावर मिळणाऱ्या मावा, सिगारेटचे दर आता दुप्पट झाले आहेत. 

कोरोना प्रतिबंधासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. शासनाच्या सर्व विभागामार्फत कोरोनाच्या नियंत्रणासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. प्रशासन कामात गुंतल्याचा मोका साधत तळीराम व नशेखोरांनी कायदा न मोडता पळवाट काढली आहे. भल्या पहाटे दारु दुकानातून अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरु आहे. तळीरामांचे गट त्यासाठी नियमांचा भंग होउ नये, याची पुरेपूर काळजी घेत आहेत. मावा, गुटखा खाणाऱ्यांनीही तीच शक्‍कल लढवली आहे. मावा किलोकिलोने तयार करुन त्याचे पार्सल बनवले जात आहे. 20 रुपयांचा मावा दुप्पट किंमतीने विकला जात असला तरीही नशेसाठी कायपण म्हणत शौकिन तल्लफ भागवत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कोरोना नियंत्रणासाठी गुंतल्याचा मोका साधत काही महाभाग हात धुवून घेत आहेत. 

नशेसाठी कायपण... 
पूर्व भागातील एकजण सांगलीत एका कारखान्यात काम करतो. पण गड्याला माव्याशिवाय कामच जमत नाही. सकाळी माव्याची कीक बसल्याशिवाय त्याचा दिवस सुरु होत नाही. कोरोनामुळे पानपट्ट्या बंद झाल्यावर गड्याने अफलातू आयडिया लढवली आहे. मावा बनवण्याचे साहित्यच खरेदी करुन "होम मेड' आस्वाद घेणे सुरु केले आहे. तर आणखी एकाने दारु दुकानाची साफसफाई करण्याचे निमित्त काढून रोज चोरुन रतीब लावला आहे. 

"अन्न, औषध'ने सोडावे नरमाईचे धोरण 
व्यसनात बरबटलेल्या पिढीची शासनाच्या बंदी आदेशामुळे अक्षरश: घालमेल सुरु आहे. मावा, दारु, गुटखा न मिळाल्याने काहीजण वैफल्यग्रस्त होण्याचा धोका आहे. काहीही करुन व्यसन पूर्ण करण्याच्या हट्टापायी काहीजण नको ते उद्योग करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सहानुभुतीने न पाहता अन्न, औषध प्रशासनाने संधी म्हणून पाहावे. प्रशासनाने आता नरमाईचे धोरण सोडून अधिक आक्रमक होणे गरजेचे आहे. 
- डॉ. मनोज पाटील, सांगली

loading image