आपकी बात "पटनी' चाहिए, आदित्य ठाकरे म्हणाले, तुमची "दिशा' चुकली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

आज (ता.17) संगमनेरमध्ये अमृतवहिनी महाविद्यालयात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली. त्या मनात दडलेली "दिशा' शोधण्याचा प्रयत्न गुप्ते यांनी केला. 

नगर : सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून आदित्योदय झाला आहे. आदित्य ठाकरे मंत्री झाल्याने ते आणखीच वलयांकीत झाले आहेत. ते काय खातात, त्यांना काय आवडते, कोण कोण आवडते, या विषयी लोकांमध्ये तसेच माध्यमांमध्ये चर्चा झडत असते. त्याबाबत आदित्य यांना वारंवार प्रश्‍नही विचारले जातात. मात्र, त्यांनी आपल्या मनाची "दिशा' काही कळू दिली नाही. तरीही त्यांच्या मनात कुणीतरी दडल्याचं आज लोकांना कळालं. 

आज (ता.17) संगमनेरमध्ये अमृतवहिनी महाविद्यालयात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली. त्या मनात दडलेली "दिशा' शोधण्याचा प्रयत्न गुप्ते यांनी केला. 
अवधूत गुप्ते आदित्य यांना म्हणाले, आपकी बात पटनी चाहिए. त्यावर आदित्य उत्तरले, तुमची दिशा चुकली! 
या प्रश्‍नोत्तराने लोकांमध्ये एकच हशा पिकला. कारण अभिनेत्री दिशा पटानीवरुन आदित्य यांना छेडल्याचं एव्हाना लोकांच्या लक्षात आलं होतं. 

महसूलमंत्र्यांचं काम चांगलं 
महसूलमंत्री थोरात यांच्याबाबत आदित्य म्हणाले, मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरु केला. अशा कार्यक्रमांतून लोकांचे प्रश्न विचारण्याचं धाडस वाढतं. असे कार्यक्रम चांगली बाब आहे. वलय मिळालं तरी आपल्यात बदल झला नाही पाहिजे, असं आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेलं आठवत नाही पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो. 

राजकारणात येण्याचा निर्णय माझाच 
आई-वडीलांनी आपल्याला मोठं केलेलं असतं. आई आपल्याला आजही ओरडते, ते प्रेमाने असतं. आई सांगायची राजकारणात जाऊ नको, बाबा आहेत. आजोबा आहेत. पेपरात चांगलं येतं, वाईट येतं. पण हाऊसमध्ये जाण्याची हौस माझीच होती. त्यामुळे शपथ घेताना मी आईचं नाव घेतलं. आजोबा हे वेगळं व्यक्तिमत्त्व होतं. मागे कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात असं म्हटलं. पण शिवसेनेत जात धर्म आणि विभाग कधीही पहिला जात नव्हता. महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. 

आता जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर 
आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्‍मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना अवधूत गुप्ते यांनी विचारला. या प्रश्नावर उपस्थित असलेल्या लोकांनी एकच कल्ला केला. या प्रश्‍नावरही आदित्य कचरले नाहीत. ""आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे.'' या प्रश्‍नालाही लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

आदित्य यांची "दिशा' कळली 
अवधूत गुप्ते यांनी अभिनेत्री दिशा पटनीबाबत छेडलं. ""आम्हाला बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात पटनी चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकलेली आहे, असं म्हणताच तो प्रश्‍न लीलया टोलवून लावला. मात्र, त्यानंतर उपस्थितांना कळंल आदित्य यांच्या मनात कोण लपलंय ते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray speaks about Disha Patani in Sangamner