जिल्ह्यातील 335 पोलिसांची प्रशासकीय बदली... "गॅझेट' प्रसिद्ध : "व्हीडिओ कॉन्फरन्सिंग' द्वारे प्रक्रिया 

घनशाम नवाथे
Friday, 24 July 2020

सांगली-  "कोरोना' मुळे पोलिस दलातील लांबलेली बदल्यांची प्रक्रिया नुकतेच "व्हीडिओ कॉन्फरन्सिंग' द्वारे पार पाडण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणे आणि इतर शाखातील 335 पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय बदल्यांचे "गॅझेट' प्रसिद्ध करण्यात आले. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे असे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिले आहेत. 

सांगली-  "कोरोना' मुळे पोलिस दलातील लांबलेली बदल्यांची प्रक्रिया नुकतेच "व्हीडिओ कॉन्फरन्सिंग' द्वारे पार पाडण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणे आणि इतर शाखातील 335 पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय बदल्यांचे "गॅझेट' प्रसिद्ध करण्यात आले. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे असे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिले आहेत. 

पोलिसांना एप्रिल महिन्यापासूनच प्रतिवर्षी बदल्यांचे वेध लागतात. यंदा मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बदल्यांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे यंदा प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षभर मुदतवाढ मिळणार की ऐनवेळी बदली होणार? याची उत्सुकता होती. अखेर पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी शासनाच्या निर्देशानुसार प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया राबवली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "व्हीडिओ कॉन्फरन्सिंग' द्वारे बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर गुरूवारी 335 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले.

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले. तसेच बदलीच्या ठिकाणी हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना तेथील कामकाजाची माहिती व्हावी, गुणवत्ता वाढावी, कायद्यातील सुक्ष्म बारकावे समजले जावेत यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक यांनी नव्याने सुरू केलेल्या "प्रेरणादायी प्रशिक्षण' या उपक्रमाची पोलिस ठाणे अधिकारी व उपाधीक्षक यांनी अंमलबजावणी करावी अशा सूचनाही दिल्या आहेत. 

दरम्यान प्रशासकीय बदल्यामध्ये सर्वाधिक कर्मचारी मुख्यालयातील आहेत. पोलिस ठाणे व शाखानिहाय बदली झालेली कर्मचारी संख्या अशी : मुख्यालय- 86, सांगली शहर- 8, विश्रामबाग- 15, संजयनगर- 26, सांगली ग्रामीण- 3, वाहतूक शाखा सांगली- 13, मिरज शहर- 16, महात्मा गांधी चौक- 21, मिरज ग्रामीण- 10, कुपवाड एमआयडीसी- 4, वाहतूक शाखा मिरज- 9, तासगाव- 13, भिलवडी- 13, पलूस- 5, कुंडल- 2, इस्लामपूर- 4, आष्टा- 3, कासेगाव- 3, कुरळप- 8, शिराळा- 4, कोकरूड- 4, विटा- 5, आष्टा- 6, कडेगाव- 3, चिंचणी-वांगी- 7, जत- 4, कवठेमहांकाळ- 4, उमदी- 5, एलसीबी- 7, बीडीडीएस- 2, डॉगस्क्वॉड- 2, महिला कक्ष- 1, जिल्हा विशेष शाखा- 2, बिनतारी संदेश- 1, नियंत्रण कक्ष- 4, वाचक शाखा 2, मोटार वाहन- 10. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrative transfer of 335 police personnel in the district . "Gazette" released: Process through "video conferencing"