नवेखेड - सलग आठ वर्षाच्या अथक परिश्रमातून नवेखेड येथील शेतकरी कुटुंबातील प्रियांका विश्वजीत दळवी हिने महिला व बालविकास विभागाच्या अधिकारीपदी मुलींमधून महाराष्ट्रात प्रथम येत विजयाला गवसणी घातली..आज सकाळी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि ती अभ्यास करीत असलेल्या शाहू स्पर्धा परीक्षा केंद्रावर तिचा सत्कार सम्पन्न झाला. लेकीला भेटण्यासाठी आई-वडील दुचाकीवरून आले. त्यांना पाहताच प्रियंकाला हुंदका अनावर झाला आणि तिने वडिलांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट करून दिली. हा प्रसंग उपस्थित असणाऱ्या प्रियांकच्या मित्रांनी मोबाईलमध्ये टिपला आणि तो व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला..विश्वजीत दळवी यांचे शेतकरी कुटुंब ते स्वतः शेती आणि सोबत टीव्ही दुरुस्तीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी अंजली दळवी या बचत गटाच्या माध्यमातून बिस्किटे तयार करून त्याची विक्री करतात.प्रियांका हिने २०१६ मध्ये आष्टा येथील डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातुन संगणकशास्त्राची पदवी घेतली. त्यावेळी कॅम्पस मुलाखतीमधून तिला मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली. परंतु तिने ती नोकरी नाकारली आणि पुणे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासला सुरवात केली..पुढे कोरोनात ती गावी परतली आणि इसलमपूर येथे अभ्यास करू लागली. प्रामुख्याने राज्यसेवेचा अभ्यास करताना अनेक पदावरील तिच्या निवडी अगदी पॉईंटमध्ये हुकल्या. अनेक वेळा यशाने हुलकावणी दिली. परंतु निराश न होता ती सतत अभ्यासात मग्न राहिली. ही परीक्षा तिची शेवटची संधी होती. तिने शूअर शॉट खेळून यश खेचून आणले. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत दळवी कुटुंबाचे अभिनंदन केले..दळवी कुटुंबातील प्रियांका हिने अभियांत्रिकीची पदवी मिळवीत महिला बालविकास मध्ये अधिकारीपद मिळविले. तिचा भाऊ प्रीतम याने कृषी शास्त्रातील पदवी मिळवीत आयआरबी मध्ये निवड झाली. तर दुसरा मुलगा प्रथमेश हा शेती कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.