esakal | महापुरानंतर व्यापाऱ्यांना दमडीची नुकसानभरपाई नाही
sakal

बोलून बातमी शोधा

महापुरानंतर व्यापाऱ्यांना दमडीची नुकसानभरपाई नाही

तरुणांनी उद्योग-धंद्यांकडे वळावे, असे शासन म्हणते. मात्र, त्याकडे वळल्यावर शासनाने अशा आपत्तीच्यावेळी तरुणांच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. आजअखेर एक रुपयाचीही भरपाई आम्हाला मिळालेली नाही. शासनाने याचा विचार करावा.
विलास पाटील, व्यापारी. 

महापुरानंतर व्यापाऱ्यांना दमडीची नुकसानभरपाई नाही

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड ः महापुरानंतर व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायचे की नाही, याचे आदेश नसल्यामुळे त्यात चार दिवस गेले. त्यानंतर पुन्हा पंचनामे सुरू करण्यात आले. पंचनामे झाल्यानंतरही संबंधित दुकानदारांच्या नुकसान भरपाईबाबत स्पष्ट कोणाताही आदेश प्रशासनाला लवकर प्राप्त झाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना भरपाई मिळणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कृष्णा-कोयना या मुख्य नद्यांसह अन्य उपनद्यांना महापूर आला. नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडल्याने पाणी गावात, बाजारपेठांत घुसले. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांना मालही हालवता आला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकानात माल ठेवून दुकान सोडावे लागले. महापूर ओसरल्यानंतर दुकानांच्या नुकसानीचे वास्तव समोर आले. त्यावेळी माल भिजून खराब झाला होता. दुकानातील फर्निचर पाण्याने फुगून खराब झाले. यासह अन्य मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यामुळे व्यापारी हवालदिल झालेले होते. त्यांनी कर्ज काढून सुरू केलेल्या व्यवसायात मोठी आर्थिक आरिष्ट आल्याने आता तो खर्च भागवायचा कशातून? हाच प्रश्न सध्या त्यांच्यासमोर आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही त्यांचे पंचनामे करण्याबाबत सूचनाच गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना नव्हत्या. त्यामुळे चार दिवस पंचनामेच झाले नाहीत. त्यानंतर व्यापाऱ्यांनी हालचाली सुरू केल्यानंतर त्यांचे पंचनामे सुरू झाले. त्यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनामे झाल्यानंतरही संबंधित दुकानदारांच्या नुकसानभरपाईबाबत स्पष्ट कोणताही आदेश प्रशासनाला मिळाला नाही. त्यामुळे भरपाई मिळणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. 

loading image
go to top