मोठी ब्रेकिंग ! कडक संचारबंदी उठल्यानंतर शेतमालासह अन्य मालाची खरेदी शहराबाहेरच; 'या' ठिकाणी केली सोय 

तात्या लांडगे
Saturday, 25 July 2020

'या' ठिकाणी माल विक्रीची व्यवस्था 
हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगणाची मोकळी जागा, अक्‍कलकोट रोडवरील गॅस पम्पजवळील मोकळी जागा, होटगी रोडवरील श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याजवळील सुपर मार्केट परिसराची मोकळी जागा, विजपूर रोडवरील एसआरपी कॅम्पजवळील मोकळी जागा, पुणे रोडवरील पुणे जकात नाका मैदान, बार्शी रोडवरील भोगाव खत डेपोजवळील मैदान आणि तुळजापूर रोडवरील मश्रुम गणपतीजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडील माल खरेदी तथा विक्री करता येणार आहे. त्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. 

सोलापूर : शहरात भाजीपाल्यासह अन्य त्यांच्याकडील माल विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांना शहरात नो एन्ट्री असणार आहे. त्यांना माल विक्री व खरेदीसाठी शहराबाहेर सात ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उद्या (रविवारी) रात्री 12 नंतर शहरातील कडक संचारबंदी उठणार असल्याने गर्दी होणार नाही, याची खबरदारी महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेत स्वतंत्र आदेश काढला. 

शहरातील कडक संचारबंदी उठल्यानंतर नागरिकांना रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात फिरण्यास बंदी असणार आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. शहरातील भाजीपाला, किरणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ, औषधे, पेट्रोलपंप, रुग्णालये सुरु राहतील. खाद्यगृह तथा रेस्टॉरंटची घरपोच सेवा पूर्वीप्रमाणे सुरुच राहणार आहे. तर खासगी कार्यालयांमध्ये दहा टक्‍के तर सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्‍के कर्मचारीच उपस्थित राहतील. त्यांना सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. गॅरेज तथा वर्कशॉपमधील वाहनांच्या दुरुस्तीची वेळ ठरवून काम करावे. विवाहासाठी खुली जागा, लॉन, मंगल कार्यालये, हॉल, सभागृह उपलब्ध करुन दिले जातील, असेही आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे. 29 जुलैपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा पोलिस आयुक्‍तांचा प्रस्ताव महापालिका आयुक्‍तांनी मान्य केला आहे. 

'या' ठिकाणी माल विक्रीची व्यवस्था 
हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगणाची मोकळी जागा, अक्‍कलकोट रोडवरील गॅस पम्पजवळील मोकळी जागा, होटगी रोडवरील श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याजवळील सुपर मार्केट परिसराची मोकळी जागा, विजपूर रोडवरील एसआरपी कॅम्पजवळील मोकळी जागा, पुणे रोडवरील पुणे जकात नाका मैदान, बार्शी रोडवरील भोगाव खत डेपोजवळील मैदान आणि तुळजापूर रोडवरील मश्रुम गणपतीजवळील मोकळ्या जागेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडील माल खरेदी तथा विक्री करता येणार आहे. त्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. 

आदेशातील ठळक बाबी... 

  • भाजीपाला मंडई सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु राहणार 
  • मटन, मांस विक्री सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु राहतील 
  • वैयक्‍तिक व्यायामासाठी क्रिडा संकुल तथा स्टेडिअमचा बाह्य भाग सुरु राहील 
  • दुचाकीवर डबलसीट तर रिक्षा तथा तीन चाकी वाहनांत दोनपेक्षा अधिक प्रवासी नको

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the lifting of the curfew the purchase of agricultural commodities and other goods outside the city