
Jayant Patil Political Discussion After Resignation : आपल्याकडे नीतिमत्ता, नैतिक मूल्ये आहेत. त्यामुळे जनता आपल्याला साथ देईल. आपण संघर्ष करत राहू, असे आवाहन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी युवक जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.