टेंभू पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचे कडेगाव तलावात जलआंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

कडेगाव - येथील तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडावे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज तलावाच्या पाण्यात उतरून जल आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

जल आंदोलकांच्या  प्रमुख मागण्या -

  • टेंभू योजनेचे पाणी खंबाळे औंध येथून मुख्य कालव्यातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे कडेगाव लघु पाटबंधारे तलावात सोडावे.
  • कडेगाव तलाव टेंभूच्या लाभक्षेत्रात घ्यावा 
  • टेंभू योजनेतून सहा आवर्तनाद्वारे पाणी द्यावे.
  • कडेगाव कालव्याची हद्द निश्चित करावी.  

कडेगावसह परिसरातील शेतकरी टेंभू पाण्यापासून वंचित राहत आहेत. यासाठी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले आहे. तर टेंभू अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी आज गनिमीकाव्याने कडेगाव तलावात जलसमाधी आंदोलन केले.

- डी. एस. देशमुख

यावेळी दत्तात्रय भोसले,अशोक शेटे,राजाराम माळी,जीवन करकटे,शिवाजी माळी,आनंदा रास्कर आदी शेतकरी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation of in Kadegaon for Tembhu water