चिकोत्रा प्रकल्पातील पाण्यासाठी सेनापती कापशीत रास्ता रोको

प्रकाश कोकितकर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सेनापती कापशी - पुनर्वसनाच्या प्रश्नांसाठी चिकोत्रा प्रकल्पातील पाणी सोडण्यास प्रकल्पग्रस्तांनी रोखल्याने कापशी व परिसरातील 20 गावात गेले दहा दिवस पाण्याचा ठणठणाट आहे. यासाठी या कापशीसह परिसरातीला नागरिकांनी आज संताजीनगर येथे रास्ता रोको केला.

पाटबंधारे खाते अडवणूक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून ऊस वाहतुकीसह सर्व वाहतूक रोखली. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदवला. साडे अकरा वाजता वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना  मुरगुड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मुरगुडला पाठवले.

सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्यासह  पथकाने कारवाई केली. यावेळी आलेल्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. सुनील चौगले, प्रवीण नाईकवाडी, मुस्ताक देसाई, दत्तात्रय वालावलकर, महेश देशपांडे, प्रकाश घाटगे, उपसरपंच दयानंद घोरपडे, तुकाराम भारमल, सौरभ नाईक, दिलीप तिप्पे, राजेश उत्तुरे, किरण नाईकवाडी, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: agitation for water in Senapati Kapshi