जाधवनगरला शेतीची माहिती घरबसल्या एका क्‍लिकवर

दिपक पवार
Monday, 24 August 2020

जाधवनगर (ता.खानापूर) येथील ग्रामपंचायतीने ई - ग्राम होण्यासाठी सकाळ व ऍग्रोवन ऍग्रोटेक इंडस्ट्रीजशी करार केला. 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गाव ई ग्राम झाले. 

आळसंद : जाधवनगर (ता.खानापूर) येथील ग्रामपंचायतीने ई - ग्राम होण्यासाठी सकाळ व ऍग्रोवन ऍग्रोटेक इंडस्ट्रीजशी करार केला. 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गाव ई ग्राम झाले. 

खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्‍याच्या सीमेवर असणारे असणारे हे गाव. सर्व घडामोडी विकासकामे, जगभरातील ताज्या घडामोडी याचीं माहिती मिळेल. शेतकऱ्यांना शेतीविषयक सखोल माहिती, बाजार भाव यांची माहिती घरबसल्या एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. सरपंच सारिका जाधव यांनी ऍग्रोवन ऍग्रोटेक इं. प्रा. लि. चे प्रतिनिधी प्रीतम बुधावले यांच्याकडे करारपत्र सुर्पुद केले. 

ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई- ग्राम चांगले माध्यम आहे. ऍपद्वारे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवकांचे छायाचित्र, माहिती समाविष्ट होणार आहे. ग्रामपंचायत कर या ई -ग्राम द्वारे भरता येतील. दंवडी देता येईल. गावाची पायाभूत माहिती, वैशिष्ट्य, विकास आराखडा मांडता येईल. ऍपद्वारे इतरांची जाहिराती करीता येते. त्यातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होईल. उपसरपंच रेखा जाधव, अजित जाधव, मानसिंग जाधव, किरण जाधव, नंदकुमार जाधव, बाळासाहेब जाधव, सुरेखा पवार, रंजना जाधव, ग्रामसेवक विशाल दौंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

बदलत्या काळानुसार लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचावीत. शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होण्यासाठी ई-ग्राम हे ऍप उपयुक्त ठरेल. 
-सारिका जाधव, सरपंच, जाधवनगर 

स्पर्धेच्या काळात प्रशासन ही बदलत चालले आहे. ई-ग्राम ऍप द्वारे शासकीय निर्णय लवकर समजतील. लोकांच्या तक्रारीचे निराकरण होईल. गावातून बाहेर असणाऱ्या लोकांना गावची इंत्थभूत माहिती मिळेल. गावाविषयी जिव्हाळा निर्माण होईल. विकासकामांच्या सूचना ऍपद्वारे मांडता येतील.'' 

- विशाल दौंड, ग्रामसेवक, जाधवनगर 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture information to Jadhavnagar at a click from home