
सलगर बुद्रुक : दक्षिण मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुक परिसरातील गावांमध्ये यंदाची खरिपाची पिके वाया जायाची चिन्हे निर्माण झाली आहेत.गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत.शिवाय जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की दक्षिण मंगळवेढ्यातील कायम दुष्काळी पट्ट्यात असलेली सलगर बुद्रुक,सलगर खुर्द,आसबेवाडी,पौट,हुलजंती,शिवनगी,सोड्डी,जंगलगी,लवंगी,मारोळी, बावची,माळेवाडी आदी गावांमध्ये चांगल्या पावसाच्या सुरुवातीमुळे मोठ्या जोमाने बळीराजांनी पेरलेली खरिपाची पिके पावसाने ओढ दिल्याने सुकून गेली आहेत.