
सांगली : आधार कार्डप्रमाणे आता केंद्र सरकारने ‘ॲग्रिस्टॅक’ शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुमारे पाच लाख खातेदार (आठ अ) आहेत. २६ जानेवारीपासून प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली आहे. ‘ॲग्रिस्टॅक’वर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ‘कुंडली’च कळणार आहे. विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. स्थानिक पातळीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकासच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.