त्या परदेशी कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पंधरा जण नगरला हलविले 

corona virus
corona virus

संगमनेर ः "होम क्वारंटाईन' केलेल्या 53 जणांचा कोरोना संसर्गाचा अहवाल "निगेटिव्ह' आल्याने, संगमनेरकर "हुश्‍श' करीत असतानाच, टेन्शनमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

नगरच्या मुकुंदनगर भागातील त्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात आलेले संगमनेरच्या नायकवाडपुरा, बागवानपुरा, लखमीपुरा, हिवरगाव पावसा भागातील 15 नागरिकांना तपासणीसाठी आज दुपारी दोनच्या सुमारास नगरला हलविण्यात आले. 

या 15 जणांच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी सुरू झाली आहे. हा संपूर्ण परिसर "सील' करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 
नगरमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण रविवारी सापडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली.

जामखेडला गेलेले येथील 15 नागरिक या दोन रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून समजल्याने संगमनेरचे प्रशासन सतर्क झाले आहेत.

आज दुपारी दोनच्या सुमारास उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप कुचेरिया, पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी कारवाई करून या व्यक्तींना नगरला पाठविले. या रुग्णांची व परिसराची स्थिती पाहता, या 15 जणांना त्यांच्या घरात "क्वारंटाईन' करणे अशक्‍य आहे.

आज दुपारी प्रशासनाने या परिसरात सावधगिरीच्या सूचना ध्वनिवर्धकावरून देत इतरांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com