नगरमध्ये शिक्षकच झालेत पोलिस...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

पाेलिस प्रशासनाला मदत करणे, आपत्कालीन व्यवस्था, विद्यार्थ्यांना शाळेत रहदारीचे  वाहतुकीचे नियम शिकविणे, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करणे अशी कामे ही संस्था नित्याने करीत आहे.

नगर ः काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संस्थेचे सुमारे 35 जण विनामाेबदला कर्तव्य बजावत आहे. आमचे जीवन सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या या वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संस्थेचे कामकाज सुरू आहे. ही संस्था शिक्षण व पाेलिस खाते यांच्या अंतर्गत आहे. या दलात जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील सुमारे 35 जणांचा समावेश आहे.

पाेलिस प्रशासनाला मदत करणे, आपत्कालीन व्यवस्था, विद्यार्थ्यांना शाळेत रहदारीचे  वाहतुकीचे नियम शिकविणे, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करणे अशी कामे ही संस्था नित्याने करीत आहे.
या दलातील प्रत्येकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही समिती जिल्हा पाेलिस अधीक्षक, वाहतूक पाेलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत अाहेत.

या दलला शिक्षणाधिकारी दिलीप थाेरे यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने त्याची व्याप्ती वाढत चालली  आहे. या दलाने राज्यात अनेक आपत्तीत आपली जबाबदारी विनामाेबदला पार पाडलेली आहे. आता काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या दलाकडून कर्तव्य पार पाडले जात आहे. पाेलिसांच्या बराेबरीने हे सर्वजण आता बंदाेबस्ताच्या कामात व्यस्त झालेले आहेत.

लाॅकडाऊन झाल्यापासून आम्ही पाेलिसांच्या बराेबरीने काम करीत आहोत. हे काम आम्ही विनामाेबदला करीत आहोत.
साेमनाथ बाेंतले, जिल्हा समादेशक.

राष्ट्रीय सेवा कर्तव्य म्हणून 22 मार्चपासून आम्ही पाेलिसांना सहकार्य करीत आहोत. हे काम करताना जनतेची सेवा हाेऊन पाेलिस प्रशासनाला मदत हाेत असल्याने समाधान वाटते.
सिकंदर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष.

कर्तव्य बजावत असलेले शिक्षक
साेमनाथ बाेंतले, किशाेर सातपुते, कैलास कानवडे, सतीश ढमाले, भाऊसाहेब खरात, संजय पाेपळघट, संजय आव्हाड, यशवंत दिघे, उल्हास देशमुख, विश्वनाथ गाडेकर, नारायण कानवडे, विकास साेनवणे, अरविंद सांगळे, गणेश झाेडगे, ज्ञानदेव जाधव, साेपान पवार, उमेश गुंजाळ, शंकर हाळणर, राजेंद्र देशमुख, बाबासाहेब वैद्य, दत्तात्रय घुले, अंगध भांगरे, साहेबराव कानवडे, श्रीरंग गाेडे, रामदास कुमकर, मच्छिंद्र नवले, कुणाल उगले, सिंकर शेख, अनुराधा माने, तुकाराम हराळ, जालिंदर झिंजाड, शिवाजी सावंत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar police become teachers ...