कमवा आणि शिका योजनेतून ऐश्‍वर्याने मिळवले उत्तुंग यश 

Aishwarya Jundale
Aishwarya Jundale

सोलापूर : काहीही झाले तरी शिक्षण घ्यायचेच ही जिद्द असेल तर यश आपसूकच मिळते, असाच काहीसा अनुभव लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील ऐश्‍वर्या राजकुमार जुंदळे हिस आला. कमवा व शिका योजनेचा लाभ तिने घेतला. वाणिज्य विभागात तब्बल 76 टक्के गुण मिळवित सोलापुरातील रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स ऍन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ती पहिली आली. तिच्या या यशामुळे अल्पभूधारक शेतकरी असलेल्या तिच्या पालकांचा ऊर भरून आला आहे. 

ऐश्‍वर्याला बूक किपिंग व अकौंट या विषयात 96 मार्क मिळाले. ती या विषयात जिल्ह्यात अव्वल आली असून पहिल्या पाच विद्यर्थिनींत तिचा समावेश झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात तिने हे यश संपादन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या घटनेस 100 वर्षे पूर्ण झाले असतानाच विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशामुळे शिक्षकवृंदही आनंदी झाले आहेत. 

ऐश्‍वर्या ही रयत शिक्षण संस्थेच्या "कमवा आणि शिका " या योजनेतील विद्यार्थिनी असून वृक्ष संगोपन, शालेय साहित्य विक्री, कार्यालयात मदत करणे या योजनेत सहभागी झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोलापुरातील आपल्या काकांकडे राहून तिने हे यश संपादन केले आहे. शिक्षण घेण्याची जिद्द तिच्याकडे असल्यामुळे गरीब, आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने सोलापूर येथे शिक्षण घेण्याचे ठरविले. या योजनेअंतर्गत महाविद्यालय दरवर्षी पाच होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाते. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, अण्णासाहेब पाटील, माधुरी पाटील, उल्का पाटील, प्राचार्य दिलीप पाटील, केतन शहा, रमेश शहा यांनी अभिनंदन केले. तिला प्रा. अमर देशमुख, प्रा. तुकाराम मस्के, प्रा. किरण भोसले, प्रा. नवनाथ हाराळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

रयत शिक्षण संस्थेने दिलेल्या संधीमुळेच हे यश प्राप्त करू शकले. उच्च शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंट होण्याची माझी इच्छा आहे. 
- ऐश्‍वर्या जुंदळे, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com