महिला अत्‍याचाराविरोधात चाळीसगाव येथे आक्रोशमोर्चा

गणेश पाटील
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मोर्चादरम्‍यान जवळपास एक ते दिड हजार हिंदू मुस्‍लिम समाजबांधवांनी सहभाग नोंदविला होता. रेल्‍वे स्‍टेशन येथुन काढण्‍यात आलेल्‍या मोर्चाचे तहसिल कार्यालयात समारोप करण्‍यात आला.

चाळीसगाव - भारतात वाढत असलेल्‍या बलात्‍काराच्‍या घटनेचा निषेध नोंदविण्‍यासाठी तसेच या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा होण्‍यासाठी चाळीसगाव येथे गुरूवारी, दि. 19 ला सकाळी 11 वाजता सर्वधर्म समावेश आक्रोशमोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. रेल्‍वेस्‍टेशनपासुन सुरूवात करण्‍यात आलेल्‍या मोर्चाचे सिग्‍नल चौक, तहसिल कार्यालयावर तहसिलदार कैलास देवरे व पोलीस निरिक्षक रामेश्‍‍वर गाडे पाटील यांना निवेदन देण्‍यात आले. 

जम्‍मु काश्‍‍मीरच्‍या कठुआ जिल्‍हयातील रसनागाव या गावातील आसिफा या आठ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्‍कार करून तिची निर्घुण हत्‍या करण्‍यात आली होती. तसेच गुजरात येथील सुरतमध्‍ये देखील बलात्‍काराची घटना घडली आहे. तसेच उत्‍तरप्रदेश येथील उन्‍नाव याठिकाणी एका नाबालीक मुलीवर देखील बलात्‍कार करण्‍यात आला. भारतात विविध ठिकाणी बलात्‍काराच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत असुन शासन याकडे दुर्लक्ष करीत अाहे. मानसिकदृष्‍टया विकृत लोक अशा घटनांना चालना देत असुन यामुळे भारताची प्रतिमा मलीन होत आहे. भारत देशात बेटी बचावचा नारा असुन देखील याच ठिकाणी मुलींवर अशा प्रकारचे अत्‍याचार होत असुन ही बाब निंदनीय असल्‍याचे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे. या घटनेना न्‍याय देण्‍यासाठी न्‍याय व्‍यवस्‍थेवर विश्‍‍वास असुन संबंधित घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्‍यात यावी, या घटनेतील नराधमांची केस जलद गती न्‍यायालयात चालविण्‍यात यावी तसेच या घटनेतील पिडीत कुटूंबाला न्‍याय देण्‍यात यावा अशी मागणी निवेदनाव्‍दारे करण्‍यात आली आहे.

मोर्चादरम्‍यान जवळपास एक ते दिड हजार हिंदू मुस्‍लिम समाजबांधवांनी सहभाग नोंदविला होता. रेल्‍वे स्‍टेशन येथुन काढण्‍यात आलेल्‍या मोर्चाचे तहसिल कार्यालयात समारोप करण्‍यात आला. यावेळी सै.इकरा सै.आसिप, अदीब एजाज अहमद, अशमीरा शेख ताहेर, अलिजा शेख रईस, सानीया शेख मेहमुद यांच्‍या काही महिला पदाधिकार्‍यांनी यावेळी तहसिलदार कैलास देवरे व शहर पोलीस निरिक्षक रामेश्‍‍वर गाडे पाटील यांना निवेदन दिले. 

आक्रोश मोर्चाला विविध संघटनांचा पाठींबा -
अत्‍याचार पिडीत बालीकांना न्‍याय मिळवून त्‍या घटनेतील आरोपींना न्‍याय मिळण्‍यासाठी काढण्‍यात आलेल्‍या मोर्चात शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रयत क्रांती सेना, रयत सेना, संभाजी सेना, राष्‍ट्रीय ग्राहक संरक्षण मंच, पिपल्‍स सोशल पाउंडेशन यांच्‍यासह विविध संस्‍था, संघटनांच्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग देवून पाठींबा दिला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Akrosh Morcha in Chalisgaon against women torture