दुष्काळी भागात सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत अक्षय करतोय यशस्वी प्रयोग 

Akshay Sagar story by atpadi sangli
Akshay Sagar story by atpadi sangli

सांगली : दुष्काळी आटपाडी गावातच अक्षय सागरचा जन्म झाला. तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची तळमळ घेऊन कृषी क्षेत्रातच करिअरचा त्याने निर्णय घेतला. सांगलीत कृषी पदवी घेऊन पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये ‘एमबीए’ला सुवर्णपदक मिळवले. ज्ञानाचा गावातल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी गाव गाठले. तेवढ्यात कोरोनाचे संकट उभे राहिले. या संकटातच शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन सुरू केले. त्यांना बांधावरून थेट विक्रीचा सल्ला देऊन हा प्रयोग यशस्वी केला. आता पूर्णवेळ गावातच राहून शेती आणि पूरक जोडधंद्याबाबत मार्गदर्शन करून  द्यायचा अक्षय सागरचा मनोदय आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले जावे, त्याला मालाची बाजारपेठेत विक्री करता यावी, दुष्काळी भागामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात, अशी त्याची तळमळ होती. ती लक्षात ठेवूनच कृषी  क्षेत्रात करिअरचा अक्षयने निर्णय घेतला. सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन कॉलेजमध्ये पदवी घेतली. पुण्यात एमआयटीमध्ये एमबीएला सुवर्णपदक पटकावले. कार्पोरेट कंपन्यांची दारे खुली होती; परंतु शेतीची आवड असल्यामुळे शेतीविषयक कंपनीत पाच वर्षे नोकरी केली. परंतु गावाकडील शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञानाकडे नेण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे डिसेंबर २०१९ मध्ये तो गावी परतला. त्यानंतर दोन-तीन महिन्यांतच कोरोनाचे संकट उभे राहिले.

लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ नव्हती. त्यामुळे नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. शेतकऱ्यांना मोफत कृषीविषयक मार्गदर्शनास प्रारंभ केला. त्याला प्रतिसाद मिळू लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मालाची बांधावरून विक्री करण्यासाठी स्वत:चा एक एकर कलिंगडचा प्लॉट निवडला. बांधावरून कलिंगड विकून दाखवली, तसेच इतरांनाही प्रोत्साहन दिले. त्यांच्यात विश्‍वास निर्माण केला. पाच एकर ते शंभर एकरांपर्यंतच्या उत्पादनात हा प्रयोग यशस्वी केला.

सध्या तो २० एकरांतील कलिंगड आणि शंभर एकरांतील डाळिंब उत्पादकांना मार्गदर्शन करतोय. अक्षयने ॲनिमल अँड डेअरी सायन्सचे प्रशिक्षण घेतलेय. त्यामुळे शेती आणि पूरक जोडधंदे सुरू करण्यासाठी तो मार्गदर्शन करतोय. तसेच सेंद्रिय शेतीचा सरकारचा उपक्रम त्याला पुढे न्यायचा आहे. कृषी भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून तो दुष्काळी भागात शेतकऱ्यांत आत्मविश्‍वास निर्माण करतोय.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com