कोई जरुरतमंद भुखा न सोयेगा !

help
help
Updated on

सांगली  ः "हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई...कोई न भुखा सोयेगा जरुरतमंद..! ' हे ब्रिद घेऊन सध्याच्या "कोरोना' आपत्तीविरोधातील लढाईत अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते मदतकार्यासाठी सरसावलेत.

विधवा, परित्यक्‍त्या, निराधार वृध्द, दिव्यांग अशा गरजूंना शोधणे आणि त्यांच्या घरापर्यंत जाऊन जगण्याची साधने पोहचवण्याचा झपाटा या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी सध्या राबवला आहे. जवळपास आठशे गरजूंपर्यंत संस्थेची मदत पोहचली आहे. जिल्हाभरातील तीन हजार गरजूंना कोरोना आपत्तीकाळात मदत पोहचवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.


अल-बैतुलमाल चॅरीटेबल तथा एबीसी ट्रस्टचे सांगली पंचक्रोशीतील अठरा शाखांतून सध्या समाजसेवेचे काम चालते. त्यात प्रामुख्याने समाजातील वंचित दुर्लक्षित महिलांना दरमहा जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट दिले जाते. या महिलांना शिवणक्‍लास प्रशिक्षण, या समाजातून पुढे आलेल्या मुलींना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्‍यक ते मार्गदर्शन असे स्वरुप आहे.


सध्याच्या कोरोना आपत्तीतील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अशा शेकडो कुटुंबांची होरपळ सुरु झाली. त्यामुळे आधीपासूनचे गरजू, आता नव्याने अशा आठशेंवर गरजू कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना जगण्यासाठी आधार देण्यासाठी एबीसीची टीम सरसावली आहे.


धान्यापासून टुथपेस्ट, तेल डाळींचे महिन्याचे किट तयार करून ते घरपोहोच दिले जात आहे. याशिवाय विविध रुग्णालयांत विशेषतः सांगली-मिरजेतील सिव्हिल अडकलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तयार जेवणाची पॅकेट दिली जात आहेत. अशा 50 नातेवाईकांना सध्या जागेवर नेऊन जेवण दिले जात आहे.

गर्दी टाळतानाच सामासिक अंतर राखून ही मदत देण्याची दक्षता घेतली जाते. ट्रस्टचे अध्यक्ष तौसिफ मुन्शी, सरचिटणीस अय्याज शेख, रहीक मुन्शी, इमाम मुल्ला सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, कयूम शेख (मेस्त्री), अशपाक सय्यद, अझहर लांबे, जुबेर खलिफा, रियाज शेख, स्वप्नील लोंढे, मोईन अत्तार, साद मुन्शी, इलियास खान असे पदाधिकारी अहोरात्र या मदतकार्यात आघाडीवर आहेत.
.......
 

""ट्रस्टच्यावतीने सांगली-मिरजेतील 300 मुस्लिम व्यावसायिकांकडे जकातीचे डबे लावले आहेत. हिंदू समाजातील अनेक दानशूर व्यक्ती सढळ हस्ते मदत करीत आहेत. त्यातूनच हा मदतकार्याचा सेतू उभा राहिला आहे. अत्यंत गरजू हाच एकमेव निकष ठेवून मदत दिली जाते. किमान तीन हजार कुटुंबापर्यंत मदत पोहचवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दात्यांनी आमच्यापर्यंत शक्‍य त्या स्वरुपात मदत पोहचवावी.''

-तौसिफ मुन्शी
अध्यक्ष, एबीसी ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com