सांगलीतील ऑनलाईन बुद्धिबळ  स्पर्धेत रशियाचा अलेक्‍झांडर विजेता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

सांगली-  सांगलीतील वासुदेव गणेश पुराणिक यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या "ऑनलाईन' बुद्धिबळ स्पर्धेमध्ये रशियाचा "इंटरनॅशनल मास्टर' अलेक्‍झांडर उलानोव हा विजेता ठरला. त्याने 57 गुणांसह विजेतेपद पटकावले.

सांगली-  सांगलीतील वासुदेव गणेश पुराणिक यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या "ऑनलाईन' बुद्धिबळ स्पर्धेमध्ये रशियाचा "इंटरनॅशनल मास्टर' अलेक्‍झांडर उलानोव हा विजेता ठरला. त्याने 57 गुणांसह विजेतेपद पटकावले.

स्पेन चा इंटरनॅशनल मास्टर लेनीस मार्टिन 51 गुणांसह उपविजेता ठरला. कझाकस्तान चा "ग्रॅंडमास्टर' पावेल कोट्‌सुर याने 41 गुणांसह तृतीय स्थान मिळवले. तर नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील विजेता तुर्की चा "नॅशनल मास्टर' अमुत अकबास यास 36 गुणांसह पाचव्या स्थानावर जावे लागले. 

सांगलीमधील मानांकित खेळाडू आणि बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित आणि सारंग पुरोहित यांच्या मार्फत ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धा घेता येत नाही. मात्र बुद्धिबळाचा प्रसार अधिक व्हावा तसेच नविन काहीतरी शिकता यावे या उद्देशाने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. दोन आठवड्यापूर्वीही पहिली ऑनलाईन स्पर्धा सांगलीतून घेण्यात आली. त्यामध्ये जगभरातून 1700 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत विविध देशातील मानांकित खेळाडूंसह 1200 खेळाडू सहभागी झाले होते. पंच म्हणून शार्दूल तपासे यांनी काम पहिले. तसेच दीपक वायचळ यांचे विशेष सहाय्य प्राप्त झाले. विजेत्या खेळाडूंना ऑनलाईन पारितोषिके दिली. स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील खेळाडू सौमील सारडा, जीत सारडा, सलोल सारडा, प्रज्वल राय, ऋषिकेश जाधव यांना विविध वयोगटात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून विशेष पारितोषिके दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alexander of Russia won the online chess tournament in Sangli