esakal | जतमध्ये या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात सर्वपक्षीय एकवटले, या पक्षात वाद
sakal

बोलून बातमी शोधा

All parties came together against the transfer of this police officer

जत कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून जतचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांची सांगली मुख्यालय येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

जतमध्ये या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात सर्वपक्षीय एकवटले, या पक्षात वाद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जत : कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून जतचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांची सांगली मुख्यालय येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गुन्हेगारी, सावकारी व भुरट्या चोऱ्या रोखण्यात त्यांनी चांगले यश संपादन केले. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जीव्हाळा निर्माण झाला. मात्र, राजकीय द्वेशापोटी त्यांची बदली करण्यात आली आहे. ती रद्द करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. 

या बदलीच्या निषेधार्थ आज बुधवारी 1 जुलै रोजी जत बंद, दुसऱ्या दिवशी रास्ता रोको व तिसऱ्या दिवशी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वगळता भाजपसह इतर बारा पक्षांच्या बैठकीत झाला. याबाबतचे निवेदन जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना दिले आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, माजी सभापती तम्मनगौडा रवी- पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, ऍड. प्रभाकर जाधव, रासपचे अजित पवार, एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील, वंचितचे अमोल साबळे, उपस्थित होते. जिल्हा परिषद सभापती सुनीता पवार, जत पंचायत समितीचे सभापती मनोज जगताप, उपसभापती विष्णु चव्हाण, संतोष मोटे, वंचितचे संजय कांबळे, यांच्या सह्या आहेत. 

आमदार विक्रमसिंह सावंत यांनी वर्षभराच्या कालावधीत एकही विधायक काम केले नाही. अधिकाऱ्यांशी वाद घालणे, बदली करणे आदी गोष्टी केल्या. त्यांनी तालुक्‍याच्या विकासासाठी एक रूपयाचा निधी आणला आहे का?, हे दाखवावे आम्ही पदाचा राजीनामा देतो. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादातून पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली झाली असून, ती नियमानुसार झालेली नाही.

ती राजकीय दबावाखाली झाली आहे. त्यामुळे शेळके यांची बदली रद्द करून त्यांना सन्मानाने जत पोलिस ठाण्यात हजर करावे, यासाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी जत बंद, रास्ता रोको व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे सुनील पवार यांनी सर्व पक्षीय बैठकीनंतर सांगितले.