गावरान कोंबड्यांचे पै-पाहुण्यांना वाटप 

KWG20A00999
KWG20A00999
Updated on

विटा (सांगली) : बॉयलरबरोबर गावरान कोंबड्यांनाही कोरोनाचा फटका बसला. व्यवसायासाठी पाळलेल्या कोंबड्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. व्यावसायिकांनी पै-पाहुण्यांना कोंबड्यांचे वाटप केले आहे. शेड सध्या रिकामी झाली आहेत. व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

 
सोशल मिडीयावरील अफवेमुळे अंडी, बॉयलरबरोबर गावरान कोंबड्या खाल्यानंतर कोरोना होईल. या भितीने व्यापारी, स्थानिक ग्राहकांनी कोंबड्या खरेदीकडे पाठ फिरवली. विटा शहर व उपनगराबरोबर खानापूर तालुक्‍यातील काही बेरोजगार तरूणांनी सातपुडा, कावेरी, डी. पी. क्रास, पंजाब गावरान जातीच्या 


कोंबड्यांची शेड केली होती. चांगले अर्थांजनही सुरू होते. धुलीवंदनला स्थानिक पातळीवर कोंबड्यांना चांगला दर मिळेल म्हणून व्यावसायिक आनंदात होते. मध्येच कोरोनाचे विरजन पडले. अडीचशे ते चारशे रुपये विक्री होणा-या कोंबडीला धुलीवंदनाला शंभर रूपयेही मिळेनात. 
एरवी या कोंबड्या बेळगाव, पुणे, गोवा, मुंबई, बेंगलोर येथील व्यापारी घेऊन जात. त्यांनीही पाठ फिरवली. नाराज व्यावसायिकांनी पै-पाहुण्यांना कोंबड्यांचे वाटप केले. काही ग्राहकांना कमी दराने विक्री केल्या. कोंबड्यांची शेड आता रिकामी पडली आहेत. 

""गावरान कोंबड्यांचे शेड आहे. कोरोना अफवेचा फटका बसला. नुकसान झाले. कोंबड्या खरेदी करीत नसल्याने औषधे, खाद्य घालून नुकसान सोसण्यापेक्षा पै-पाहुण्यांना खाण्यासाठी दिल्या.'' 
-किरण जाधव, शिवाजीनगर (विटा) 

 

""सातपुडा, कावेरी, डी. पी. क्रास, पंजाब गावरान या जातीचे एक दिवसाचे पक्षी व्यावसायिकांना होलसेल दरात विकण्याचा व्यवसाय करतो. कोरोनाच्या अफवेमुळे व्यावसायिक घेईनात. ज्या विक्रीसाठी तयार आहेत. त्याकडे ग्राहक व व्यापा-यांनी पाठ फिरवली.'' 

-रामचंद्र भिंगारदेवे, 
गावरान चिक्‍स सल्लागार व होलसेल विक्रेते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com