गुड न्यूज : "या' तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साडेसहा कोटी वाटप

money
money
Updated on

मंगळवेढा : ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी दुसऱ्या हप्त्यात तालुक्‍यातील 48 गावांतील 14 हजार 868 शेतकऱ्यांना 6 कोटी 63 लाख 6 हजार 816 रुपये अनुदानाचे वाटप थेट बॅंक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

जिरायती, बागायती व फळबागांना मिळाले अनुदान
ऑक्‍टोबर महिन्यातील अतिवृष्टीत शेतकऱ्याला आधार देण्यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या तत्काळ बैठका घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामध्ये यापूर्वी 27 गावांतील 6667 शेतकऱ्यांना तीन कोटी 19 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील या अनुदानातून जिरायती क्षेत्रातील 8 हजार 447 शेतकऱ्यांना 3 कोटी 54 लाख 86 हजार 176 रुपये, बागायती क्षेत्रातील 5595 शेतकऱ्यांना 2 कोटी 27 लाख 61 हजार 104 व फळबागांच्या 826 शेतकऱ्यांना 80 लाख 59 हजार 536 रुपये अनुदान थेट बॅंक खात्यावर जमा करण्यात आले.

गाव, शेतकरी संख्या आणि अनुदान
लेंडवेचिंचाळे 151 (425600), मारोळी 83 (254000), हाजापूर 300 (703600), पाटकळ 165 (340600), मेटकरवाडी 5 (8200), जित्ती 224 (660000), खवे 280 (1539200), मारापूर 348 (1284200), शेलेवाडी 131 (419200), घरनिकी 268 (714000), अकोले 277 (1112800), देगाव 57 (310160), बठाण 229 (1501420), उचेठाण 225 (1594820), मानेवाडी 164 (204960), पडोळकरवाडी 144 (283800), लोणार 349 (546360), हुन्नूर 199 (386200), रेवेवाडी 141 (260000) नंदेश्‍वर 173 (1073000), खडकी 36 (365320) माचणूर 422 (1846940), रहाटेवाडी 270 (1237880), तामदर्डी 331 (1641080), गणेशवाडी 151 (326000), भोसे 675 (3416400), महमदाबाद शे. 129 (583600), डोणज 608 (3327184), भालेवाडी 219 (1717320), नंदूर 726 (3208000), शिरसी 389 (1065200), मरवडे 644 (2960600 ), बोराळे 1227 (7565220), कागस्ट 154 (675400), डोंगरगाव 108 (538560), कचरेवाडी 283 (1157040), मंगळवेढा 1096 (7456320), निंबोणी 246 (616200 ), चिक्कलगी 184 (586000), शिवणगी 170 (812600), येळगी 135 (770800 ), गोणेवाडी 365 (702920), गुंजेगाव 254 (918240), ब्रह्मपुरी 388 (1869200), तळसंगी 649 (2124880 ), खुपसंगी 281 (647132), कात्राळ 238 (1349040), हुलजंती 577 (3199620).

पाच गावांतील शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुदान प्राप्त होताच त्या शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर अनुदान तत्काळ वितरित करण्यात येईल.
- स्वप्नील रावडे, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com