"सगळे व्यवसाय सुरू...मग जीम बंद का'...रोग प्रतिकारशक्तीसाठी जीम ला परवानगी द्या 

घनशाम नवाथे
Wednesday, 5 August 2020

सांगली-  कोरोनामुळे पाच महिने जीम बंद आहेत. अनलॉक तीन मध्ये केंद्र सरकारने जीम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकारने बंदिस्त जीमला परवानगी नाकारली आहे. जीम चालक पाच महिन्यात मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना जीम सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी जीम ओनर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. 

सांगली-  कोरोनामुळे पाच महिने जीम बंद आहेत. अनलॉक तीन मध्ये केंद्र सरकारने जीम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकारने बंदिस्त जीमला परवानगी नाकारली आहे. जीम चालक पाच महिन्यात मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना जीम सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी जीम ओनर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. 

जीम ओनर्स संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मंगळवारी (ता.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. त्यांनी जीम सुरू करण्याची जोरदार मागणी केली. "रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर जीम खुली करा', "जागा भाडे आणि वीज बिल माफ करा', "सगळे चालू मग जीम का बंद' असे फलक घेऊन जीम चालक एकत्र जमले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, कोरोनामुळे जीम व्यवसाय संपूर्णपणे देशात पाच महिने बंद होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात जवळपास 15 हजार जीम चालक, मालक, प्रशिक्षक, कर्मचारी, योगा शिक्षक, झुंबा शिक्षक, डायटिशन, मसाजिस्ट, न्युट्रिशन दुकान चालक आदी पूरक व्यवसायातील कामगार बेरोजगार आहेत. त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जीम चालकांचे लाखो रूपयांचे भाडे थकले आहे. कर्मचारी, प्रशिक्षक पगार आणि इतर खर्च कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. 

केंद्र सरकारने ऍनलॉक तीन मध्ये जीम सुरू करण्यास पाच ऑगस्टपासून परवानगी दिली. मात्र राज्य सरकारने निराशा केली. सध्या ज्या व्यवसायातून कोरोना पसरू शकतो त्यांना परवानगी दिली. परंतू व्यायामशाळेत रोग प्रतिकारशक्ती वाढत असताना सुद्धा तो बंद केला आहे. त्यावरून सरकार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीम सुरू करण्यास परवानगी द्यावी तसेच आर्थिक सहकार्य करावे. अन्यथा परवानगी शिवाय जीम सुरू करू असा इशाराही निवेदनाद्वारे दिला. 
संघटनेचे अध्यक्ष आशुतोष कुलकर्णी, विजयसिंह पाटील, फिरोज शेख, इनायत तेरदाळकर, श्रीकांत जयगोंड, सागर खोत, वाहिद मुलाणी, विजय कुंभार आदी जीम चालक यावेळी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow the gym for immunity