Almatti Dam Water Storage 2026
esakal
Almatti Dam water level 2026 : पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका निर्माण करणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातील यंदाचा पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही दुष्काळाची तीव्रता जाणवू लागल्याने त्याचा थेट परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. परिणामी, सीमा भागातील शेतकरी आणि नागरिकांसमोर आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.