सोशल मीडियाचा असाही वापर..जमवले इतके लाख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

या मदतीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी आदींनी शिक्षकांचे कौतुक केले आहे. 

संगमनेर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जनतेला मदतनिधीसाठी आवाहन केले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगमनेर येथील एका व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील 415 शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून दोन लाख 11 हजार 555 रुपयांचा निधी गोळा केला. 

संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समिती व बीएलओ संघर्ष या ग्रुपवरील सदस्यांनी, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून, कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीत प्रशासनाला मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

हेही वाचा - व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिन बाराच्या भावात

अवघ्या पाच ते सहा दिवसांत दोन लाख 11 हजार 555 रुपयांचा निधी जमा झाला. या रकमेचा धनादेश सुनील ढेरंगे, शिवाजी दुशिंग, संदीप पोखरकर, शशिकांत आव्हाड, रवींद्र अनाप, शिवाजी आव्हाड, केशव घुगे आदींनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे सुपूर्द केला. 
या मदतीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी आदींनी शिक्षकांचे कौतुक केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Also use of social media