अमन मित्तल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमन मित्तल यांची नियुक्‍ती झाली आहे. मित्तल सध्या नाशिक येथे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमन मित्तल यांची नियुक्‍ती झाली आहे. मित्तल सध्या नाशिक येथे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ. कुणाल खेमनार यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती झाल्यानंतर त्यांच्या रिक्‍त जागेवर मित्तल यांची नियुक्ती झाली आहे.

मित्तल हे २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. २०१४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत ते देशात २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. निवडीवेळी त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. निवडीनंतर त्यांची पहिलीच नेमणूक नाशिक येथे झाली होती. 

मित्तल हे मूळचे नवी दिल्ली येथील असून, ते इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी ही पदवी नवी दिल्ली येथील आयआयटी येथून घेतली आहे. तसेच ते आय. सी. टी.मधून एम. टेक. झाले आहेत. त्यांना बुद्धिबळ खेळाची आवड असून ध्यानधारणा हा त्यांचा छंद आहे. डॉ. खेमनार हे आय.ए.एस. होते. त्यांच्यानंतर मित्तल हे सर्वांत कमी वयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेला लाभले आहेत.

Web Title: Aman Mittal Kolhapur ZP CEO