महापुराबाबत आठ देशांच्या राजदूतांनी घेतली संभाजीराजे यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हजारोंचे आयुष्य अक्षरश: उद्‌ध्वस्त केली, पुराच्या पाण्यामुळे शिवार तर कुजलंच; पण अनेकांच्या चुलीही विझल्या. या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अवघे राज्य सरसावले असताना आज या आपत्तीची अन्य देशांनीही गांभीर्याने दखल घेत पीडितांना मदत करण्याची तयारी दर्शविली. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर व सांगलीतील महापुराची माहिती आठ देशांच्या राजदूतांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी दिली. त्यामुळे कोल्हापूर, सांगली महापुराचा विषय आता आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचला आहे. जर्मनीचे डॉ. जास्पर वेक, कॅनडाचे नादीर पटेल, ब्राझीलचे अँड्री अरान्हा कोरीआ दो लागो, पोलंडचे ऍडम बुराकोव्हस्की, रॉबर्ट डझिदेझिक, इव्हा, बल्गेरियाचे इलोनारा दिमित्रोवा, स्पेनचे रामोन बारानानो, नॉर्वेचे निल्स रॅगनर आणि ट्युनेशिया या देशांच्या राजदूतांनी संभाजीराजेंकडून महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. 

कोल्हापूर  : कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हजारोंचे आयुष्य अक्षरश: उद्‌ध्वस्त केली, पुराच्या पाण्यामुळे शिवार तर कुजलंच; पण अनेकांच्या चुलीही विझल्या. या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अवघे राज्य सरसावले असताना आज या आपत्तीची अन्य देशांनीही गांभीर्याने दखल घेत पीडितांना मदत करण्याची तयारी दर्शविली. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर व सांगलीतील महापुराची माहिती आठ देशांच्या राजदूतांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी दिली. त्यामुळे कोल्हापूर, सांगली महापुराचा विषय आता आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचला आहे. जर्मनीचे डॉ. जास्पर वेक, कॅनडाचे नादीर पटेल, ब्राझीलचे अँड्री अरान्हा कोरीआ दो लागो, पोलंडचे ऍडम बुराकोव्हस्की, रॉबर्ट डझिदेझिक, इव्हा, बल्गेरियाचे इलोनारा दिमित्रोवा, स्पेनचे रामोन बारानानो, नॉर्वेचे निल्स रॅगनर आणि ट्युनेशिया या देशांच्या राजदूतांनी संभाजीराजेंकडून महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. 

संभाजीराजे म्हणाले, ""शतकभरात इतका प्रलयकारी पूर पाहायला मिळाला नव्हता. यात राज्याचे मोठे नुकसान झाले. महापुरात सुमारे तीस लोकांना जीव गमवावा लागला. पशुधन आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.'' त्यानंतर सर्व देशांच्या राजदूतांनी पूरग्रस्त भागाला सावरण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

दिल्लीत माझे चांगले आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाले आहेत. त्याचा फायदा आगामी काळात महाराष्ट्राला मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 
- संभाजीराजे, खासदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambassadors of 8 countries discuss about maharashtra flood with sambhajiraje bhosale