esakal | आंबटकर म्हणतात, आम्ही पक्ष वाढवायला बसलो आहोत
sakal

बोलून बातमी शोधा

Ambatkar says we are sitting to expand the party

""भाजप कॉंग्रेसयुक्त होतोय, असे लोकांना वाटत असले, तरी आम्हाला वाटत नाही. 1952 मध्ये उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करणार आहोत. तेही बेधडकपणे! आम्ही पक्ष वाढवायला बसलो आहोत. त्यामुळे ज्यांना पक्षात यायचे ते येतील, ज्यांना थांबायचे ते थांबतील.''

आंबटकर म्हणतात, आम्ही पक्ष वाढवायला बसलो आहोत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नगर : ""भाजप कॉंग्रेसयुक्त होतोय, असे लोकांना वाटत असले, तरी आम्हाला वाटत नाही. 1952 मध्ये उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करणार आहोत. तेही बेधडकपणे! आम्ही पक्ष वाढवायला बसलो आहोत. त्यामुळे ज्यांना पक्षात यायचे ते येतील, ज्यांना थांबायचे ते थांबतील,'' असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा पक्षनिरीक्षक रामदास आंबटकर यांनी आज स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आज जिल्ह्यातील 12 मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आंबटकर बोलत होते.

ते म्हणाले, ""जिल्हा कोअर कमिटीची सकाळी बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची सदस्य नोंदणी, शक्ती केंद्रे, बूथरचना यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात 97 हजार बूथ आहेत. स्थानिक पातळीवर केलेली रचना सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोचविणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ संमेलन घेण्याची तयारी केली आहे. मुलाखतीसाठी आलेले इच्छुक पक्षाचा उमेदवार म्हणून लढण्यास तयार आहेत. अन्य पक्षांचे इच्छुक आल्यास त्यांच्याही मुलाखती घेऊ. आम्ही पक्ष वाढवायला बसलो आहोत. समाजातील प्रत्येक घटकामध्ये भाजपचा कार्यकर्ता असला पाहिजे. पक्ष सर्वदूर पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.''


विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नातेवाईक भाजपमध्ये येत असल्याबाबत म्हणाले, ""कोणाचे नातेवाईक आमच्या पक्षात येत असतील, तर ते त्यांचे नातेवाइकांनी पाहावे. गेल्या निवडणुकीत भाजपला 122 आणि शिवसेनेला 62 जागा मिळाल्या होत्या. मतदारसंघनिहाय अहवाल मुख्यमंत्र्यांकडे जाईल. युतीबाबत मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील निर्णय घेतील. आम्ही मुख्यमंत्र्यांना पाहतो. हा सगळा कुणबा घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहेत.''

त्यांना पुन्हा पक्षात घेऊ
भाजपने निलंबित केलेले कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी आज भेट घेऊन तशी इच्छा व्यक्त केली, असे सांगून आमदार आंबटकर म्हणाले, ""इकडे-तिकडे गेलेल्यांना पक्ष घेत आहे. पक्षाने निलंबित केलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनाही पुन्हा पक्षात घेण्यात येईल.''

भाजप सर्व जागा जिंकू शकतो
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप गेल्या दोन वर्षांपासून तयारी करीत आहे. जिथे काहीच नाही, तेथे भाजप जिंकत आहे. आम्ही कोठेही जिंकू शकतो. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि युतीसाठीही तयार आहोत. युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, असे आंबटकर यांनी स्पष्ट केले.
loading image
go to top