
शिराळा : ‘नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जगप्रसिद्ध असणाऱ्या शिराळा नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे. नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करावी,’ अशी मागणी खासदार धैर्यशील माने व आमदार सत्यजित देशमुख यांनी केली.