शेतमजुर महिलांनी दिली मजुरीची रक्कम कोरोना लढ्यासाठी 

BHILWADI MAJUR.jpeg
BHILWADI MAJUR.jpeg
Updated on: 

भिलवडी (सांगली)-  येथील साठेनगर मधील 51 शेतमजुर महिलांनी एक दिवसाच्या मजुरीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन दातृत्वाचा वेगळा पायंडा समाजासमोर उभा केला . 


येथील अण्णा भाऊ साठेनगरमध्ये बहुसंख्य गोरगरीब मजुर राहतात . त्यांची हातावरची पोटं . रोज कुणाच्या तरी बांधाला कामाला जावे तेव्हा कुठे हाता-तोंडाची गाठ पडते अशी एकंदर इथल्या लोकांची स्थिती आहे . 
कोरोना विषाणुसारख्या महामारीचे दोन महिण्यापासुन जगभरात थैमान सुरू आहे. ते पुढे कितीकाळ चालेल याबाबत अजुनही अनभिज्ञता आहे.या महामारीने साऱ्या देशाला लॉकडाऊन केले. त्याने आर्थिक चक्रच थांबले आहे .ग्रामीण भागात त्याचे परिणाम दिसत आहेत. ही महामारी रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासन चेनकेन प्रकाराने प्रयत्न करीत आहे.थांबलेले चक्र सुरू करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे . 


इथल्या साठेनगरातील बहुसंख्य मजुर निरक्षर आहे . कोरोनामुळे देश व राज्यावर आलेल्या संकटाची माहिती त्यांनी टीव्हीवर पाहिली अन ऐकली . या संकटप्रसंगी आपणही खारीचा वाटा उचलु , अशी खुणगाठ मनी बाळगली .या आवाहनाला प्रतिसाद देत साठेनगरातील या मजुरांनी आपली दिवसभराची कमाई देऊ केली. सुमारे पन्नासभर मजुरांकडुन पाच हजार शंभर रूपये जमा झाले. ही रक्कम त्यांनी भारतीय स्टेट बॅंकेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केली . 

खारीचा वाटा 
 कुबेरवर्गाचा आर्थिक मदतीचा आकडा भले लाख - कोटींच्या घरात असेल , मात्र, शेतमजुरांची ही छोटी मदत समाजधुरीनांच्या डोळयात अंजन घालणारी आहे. 'देणेवालेकी नियत देखी जाती आहे' ही उक्ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. कारोनाच्या लढ्यात अमाचाही खारीचा वाटा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com