
Sangli Businessman : ‘मृत्यू हा जीवनाचा अंत नसून, तो मानवतेसाठी अमर योगदान देण्याची संधी आहे,’ या विचारांना अनुसरून इस्लामपूरमधील पटेल (पाटीदार) समाजाने एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. दिवंगत गंगादास पटेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदान, त्वचादान आणि देहदान करण्याचा निर्णय घेत समाजात सामाजिक भान आणि संवेदनशीलतेचा मोठा आदर्श निर्माण केला.