
मंगळवेढा : एका धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो, ईश्वर सगळ्यांचे कल्याण करो सांगणारा धर्म कधीच आतंकवाद निर्माण करत नसतो पण दुर्दैव आपलं आहे, दंगली करणारे ग्रंथ वाचत नसतात आणि ग्रंथ वाचलेले दंगली करत नसल्याचे प्रतिपादन कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.