
-बलराज पवार
सांगली : जिल्ह्यातील ३३३ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा संयंत्र बसवण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातून दर दिवशी सुमारे १६०० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. या अंगणवाड्यांची सध्याची विजेची गरज ही सुमारे सातशे ते आठशे युनिट आहे. त्यामुळे उर्वरित वीज ‘महावितरण’कडे राखीव असणार आहे. भविष्यात विजेवरील उपक्रम वाढल्यास या विजेचा उपयोग होणार आहे.